Sunday, 11 March 2018

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजणा
 ......एक यशोगाथा

    स्‍वांतत्र्यापुर्वी जमीनचे केंद्रीकरण एका ठरावीक वर्गाकडे झाल्‍याने मोठया प्रमाणावर विषमता वाढीस लागली होती. स्‍वातंत्र्यानंतर सरकारने समाजिक कल्‍याण हया तत्‍वाचा स्विकार व अंगीकार केल्‍याने जमीन धारणेची असलेली विषमता दुर करण्‍यासाठी अनेक जमीन सुधारणा कायदे मंजुर करून अमलात आणण्‍याची कार्यवाही सुरू केली गेली . तसेच काही जमीनधारणा व  वतन  इ. कायदे रद्द करण्‍यात आले. आचार्य विनोबा भावे सारख्‍या काही समाज सुधारकांनी ‘भुदान चळवळ’ चालवुन काही प्रमाणात समाजाची मानसिकता बदलण्‍याचे प्रयत्‍न केले.
     कुळ कायदा व  सिलींग कायदा या कायदयांनी दुर्बल व वंचित समाज घटकांना  जमिनीची मालकी देण्‍याचा प्रयत्‍न केला गेला. समाजवादी समाजरचनेचा स्विकार झाल्‍याने अनेक वंचित, दुर्बल, मागास जातींना जमीनीची मालकी प्राप्‍त झाली. १९८०-९० च्‍या दशकात मागासवर्गीय समाजाची गायरान अतिक्रमणे नियमानुकुल करण्‍याचा महत्‍वाकांची निर्णय शासनाने घेवुन त्‍याची अमंलबजावणी करण्‍यात झाली. समाजकल्‍याण साधणे व अनुसूचित जाती ,नवबौद्ध  समाजातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना मुख्‍य सामाजिक प्रवाहात आणण्‍यासाठी त्‍यांना हक्‍कांची जमीन मालकी मिळवुन देणे यासाठी शासनाच्‍या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागा मार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजणा राबवली जात आहे .
    सदर योजनांची अमलबजावणी व यशोगाथा या बाबतचा उहापोह करण्‍याचा प्रयत्‍न या प्रस्‍तुत लेखात करण्‍यात आला आहे.  सन २००४ -२००५ पासून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबाना ज्याच्याकडे जमीनीची मालकी नाही  त्‍यांच्‍यासाठी ४ एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला .सदर  योजना ही सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग  व महसुल विभाग यांच्‍या समन्‍वयाने राबवली जाते. त्यासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान व ५० टक्के कर्ज याप्रमाणे अर्थसाहाय उपलब्ध करून दिले जाते .

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची परिणामकारक  अमंलबजावणी कन्‍नड तालुक्‍यात करणेत आली . या योजनेच्या यशस्वीतेसाठी महसूल विभाग , समाजकल्‍याण विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग यांचा समन्‍वय आवश्‍यक होता . सदर समन्‍वय साधण्‍याच्‍या दृष्‍टीने आम्‍ही यशस्‍वी झालो.  तालुका स्‍तरावर संबंधीत प्रांत अधिकारी/ उपविभागीय महसुल अधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती तर जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली जमीन वाटप समिती कार्यरत आहे. जिल्हा स्तरावरील जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम करतात.  तर तालुका स्तरावर जिल्हा समाजकल्याण निरीक्षक हे सदस्य सचिव म्हणून काम करतात .कन्नड तालुका स्‍तरीय उप  समितीने  प्रचलित शासन दराप्रमाणे उपलब्‍ध असलेल्‍या जमिनी खरेदी करण्‍याची शिफारशी जिल्‍हा समितीला करून तालुका स्‍तरावर एक ५०० एकर  जमिनीचा  जमीन बँक /“Land Pool” तयार केला गेला .  जमीन निवड करतानी ती कसण्यालायक व लागवड योग्य असणे अनिवार्य आहे . त्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांचे टीम मार्फत जमिनीची प्राथमिक छाननी करण्यात येवून लागवड युक्त जमिनीची निवड करण्यात आली .
     अनुसूचित जाती व नवबौद्ध योग्‍य व गरजु लाभार्थी शोधणेसाठी समाज कल्याण विभाग मार्फत या योजनेची प्रसिद्धी करण्यात येते .त्यासाठी वृतपत्र सारखे मध्यम वापरले जाते मात्र आम्‍ही तलाठी व ग्रामसेवक यांचे मार्फत योजनेची  ग्रामीण भागात योग्‍य अशी प्रसिध्‍दी केली.  योग्य लाभार्थी छाणनी व कसण्या लायक जमीनीची निवड या दोन बाबी महत्‍वाच्‍या असल्‍याने त्‍याबाबत योग्‍य ती काळजी घेण्‍यात येवुन क्षेत्रीय कर्मचा-यामार्फत छाणनी, तपासणी, पडताळणी करण्‍यात आली. जमीनी उपलब्‍ध झाल्‍यानंतर तालुका व जिल्हा  स्‍तरावरून पात्र लाभार्थी यांचे अर्ज मागाविले गेले.सदर योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदार हा गावातील कायम रहीवाशी,भुमीहीन, दारीद्ररेषेखालील,  असणे गरजेचे आहे . परितक्त्या व विधवा लाभार्थी असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात आले. लाभार्थींची यादी तयार झाल्यावर  तालुका स्‍तरीय समितीने लॉट पद्धती अथवा अर्जाच्‍या प्राप्‍त दिनांकानुसार संबंधीत अर्जदारांच्‍या समक्ष जमीन वाटप बाबत प्राथमिक छाननी करण्यात आली. त्यानंतर जिल्‍हा समितीस अंतीम मंजुरी साठी प्रस्‍ताव सादर करण्‍यात आले . जमीनी वाटप करण्‍यासाठी आम्‍ही दोन टप्‍पे तयार केले होते . या योजनेत कन्नड तालुक्यात वर्षभरात  जवळपास १५०  एकर जमीनीचे वाटप आम्‍ही  नवबौद्ध व अनुसूचित जाती लाभार्थी यांना करू शकलो.

जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाल्या नंतर जमीनीची मोजणी उपअधिक्षक भुमी अभिलेख यांचे मार्फत केली गेली  व नकाशे तयार केले गेले. मोजणी नंतर चतुःसिमा निश्चित करून सदर लाभार्थी यांची प्रतिबंधीक मालकी नोंद ७/१२ उता-यात घेवुन तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मार्फत ताबा दिला गेला .  या योजनेत मिळालेली जमिनीचे हस्तांतरण करता येत नाही . अनुदान वगळून दिले जाणारे ५० टक्के कर्ज हे बिनव्याजी व १० वर्ष परतफेड असलेले असते . कर्जाचा हप्ता हा २ वर्षानंतर सुरु होतो. सदर लाभार्थी यांनी शेतीचे उत्पन्न घेवून हप्ते फेडावे असे अपेक्षित असते . एकदा जमीन वाटप केली की त्‍या जमिनीवर हंगाम सुरु झाल्‍यानंतर ती जमीन लाभार्थीने कसणे व त्‍याआधारे उत्‍पन्‍न घेऊन जिवनमान उंचवणे आवश्‍यक असल्‍याने संबंधित लाभा‍र्थी यांची माहीती कृषी विभागाला पाठवुन विशेष घटक योजनेखाली लाभ देणे साठी आम्‍ही त्यांना आदेशीत केले . त्याच सोबत वाटप जमीनी वर अतिक्रमण होणार नाही यासाठी योग्य सूचना आह्मी संबधित गाव कामगार तलाठी यांना आह्मी दिल्या . एकंदरच एका  लाभा‍र्थीला ४ एकर पर्यंत जमीन देण्‍याचे धोरण आम्‍ही राबवु शकलो. जमीनीला ग्रामीण भागात अजुनही काळी आई समजले जाते. निश्चितच लाभार्थी  त्‍याचे चेह-यावरचे उत्‍साह व समाधान आम्‍ही आमच्‍या डोळयात साठवत होतो. लवकरच पावसाळा सुरू होणार होता आणि या हंगांमात हे लाभार्थी त्‍यांचे शेतात त्‍यांच्‍या हक्‍कांचे पिक  घेण्‍यासाठी सज्‍ज झाले होते.
                                                              
                                                                              राजु नंदकर
                                                            उपजिल्‍हाधिकारी जालना
                                                              ९९७०२४६४१७
rsnandkar@gmail.com

दिनांक 04/11/2003
“गुणवत्ता व समर्पण ”
    गायकाचा गळा कितीही सुंदर असला तरी, रियाजाशिवाय त्‍या गळयातून सप्‍त सुर बाहेर पडू शकत नाही. त्‍याचप्रमाणे गुणवत्‍ता असूनही त्‍या गुणवत्‍तेला परिश्रमाची जोड नसेल तर त्‍या गुणवत्‍तेच मोल शुन्‍य राहतं. माणसं नेहमी स्‍वतःला ओळखण्‍यात चुकतात. स्‍वतःबददल असणारा अहंकार त्‍यांना कधीही आत्‍मपरिक्षण करण्‍याची संधी देत नाही. अशी माणसे नेहमी स्‍वतःला पुढे ढकलत राहतात. आपल्‍या अपयशाचं खापर नेहमी आपल्‍या दुःखमय परिस्थितीवर फोडतात. त्‍यांच्‍या मनाची आंदोलने सारखी वरती खाली होत असतात. स्‍वतःला निराशेच्‍या गर्तेत ढकलून दुःख करत बसतात. परंतू कोणतीही कृती करण्‍याचा प्रयत्‍न ते करत नाहीत. या माणसांमधील आपण एक आहोत का ?
    कोणत्‍याही क्षेत्रात प्रवेश करा, तुम्‍हाला स्‍पर्धा करावीच लागेल. आपल्‍यासारखी सामान्‍य बुध्‍दीची माणसे निराशेच्‍या गर्तेत ब-याचदा अडकतात व स्‍वतःला हरवून बसतात. काळाचा मलम दुःखावरची खपली काढून टाकतो. आपण जोमाने अभ्‍यासाला व कामाला लागतो परंतू निराशेच्‍या गर्तेत गमवलेला वेळ आपल्‍यापासून खूप दूर गेलेला असतो. आणि तो पुन्‍हा आपल्‍याला कधीही मिळत नाही.    कोणत्‍याही ध्‍येयाकडे अग्रेसर होतांना वेळेचं मुल्‍य (Value) किती अनमोल (Milestone) असते याचं उत्‍तर अगदी 1 मार्कावरुन पोस्‍ट हुकलेल्‍या व्‍यक्‍तीला विचारा किंवा ऑलम्‍पीक पदक हुकलेल्‍या खेळाडूला विचारा. व्‍यक्‍तीची ताकद (Power) त्‍याच्‍या गुणवत्‍तेत नसते तर समर्पणात असते (Devotion). त्‍यामुळे आयुष्‍यात कोणतीही गोष्‍ट मिळवायची असेल तर तुम्‍ही स्‍वतःला समर्पित करा. अगदी 100%. तेव्‍हाच ती गोष्‍ट तुम्‍हाला मिळेल.
    स्‍वतः विषयी कमी बोलण्‍यास शिका. दुस-याचं बोलणं पुर्ण एैका. त्‍यानंतरच तुम्‍ही तुमचं म्‍हणनं योग्‍य शब्‍दात व थोडक्‍यात मांडा. उगाच स्‍वतःच भांडवल करु नका. इतरांना बोलण्‍याची संधी दया. जास्‍त बोलण्‍यापेक्षा जास्‍त एैकणं कधीही श्रेयस्‍कर. स्‍वतःचा आत्‍मविश्‍वास तुम्‍ही हरवून बसला अस्‍साल तर उठा जागे व्‍हा व कृती करा. यश तुमचेच आहे. आज तुम्‍ही कष्‍ट करतांना रडत असाल परंतू उदया तुम्‍हाला तुमच्‍या चेह-यावर हास्‍य आणायचे असेल तर तुम्‍हाला आज रडावेच लागेल. काळया ढगातूनच किरणे बाहेर येतात, काळोखी रात्र अनुभवल्‍याशिवाय तेजोमय सकाळ अनुभवली जात नाही. हे जवढे खरे तेवढेच कष्‍ट घेतल्‍याशिवाय यश मिळत नाही. हे खरे आहे.
    स्‍वतःच्‍या अतर्मंनात / आत्‍म्‍यात प्रवेश करा. आपण कोण आहोत ? आपल्‍याला काय करायचं आहे ? आपण कोठे आहोत ? आपण चुकत आहोत का ? आपण काय करायला हवं ? हे पाच प्रश्‍न त्‍या अंतर्मनाला विचारा ते मन तुम्‍हाला या पाच प्रश्‍नांची उत्‍तरे निसंकोचपणे देईल. हे सर्व झाल्‍यावर फक्‍त पाचव्‍या प्रश्‍नाला अग्रक्रम दया. मग पहा दुस-या प्रश्‍नाचं उत्‍तर तुम्‍हाला लवकरच मिळेल.
    इतरांच्‍या टिकेला व्‍यवस्थित सामोरे जा. अन्‍यथा त्‍या टिकेकडे दुर्लक्ष करा. संकुचित वृत्‍तीच्‍या लोकांकडे दुर्लक्ष करा. या सर्व गोष्‍टींपेक्षा आपल्‍या ध्‍येयाची व्‍याप्‍ती खूप मोठी आहे हे लक्षात ठेवा. आयुष्‍यात ध्‍येयाकडे मार्गक्रमण करताना लहान मोठी दुःखे, संकटे, अपयश तुम्‍हाला अडवणार नाहीत. याची तुम्‍ही काळजी घ्‍या.
    शेवटी एकच गोष्‍ट लक्षात घ्‍या, जो आळशीपणा झटकतो, स्‍वतःला ओळखतो, कष्‍ट करतो, स्‍वतःला समर्पित करतो, कधीही विचलीत होत नाही, आशावादी असतो. आज जरी माझा नसला तरी उदयाचा दिवस माझा आहे असं समजतो व  स्‍वतःवर विश्‍वास ठेवतो तोच या जगात यशस्‍वी होतो.
राजू नंदकर,
उपजिल्‍हाधिकारी, जालना
9970246417


DO

संपादनाच्या तीनशे प्रकरणांमध्ये निवाडा

जालन्याची राज्यात आघाडी जालना/वार्ताहर गत आर्थिक वर्षांत (२०११-१२) जिल्ह्य़ात भूसंपादनाच्या तीनशेपेक्षा अधिक प्रकरणांचा निवाडा करण्यात ...