RAJU NANDKAR DEPUTY COLLECTOR BLOG

Not Me But For You

Thursday, 16 April 2020

संपादनाच्या तीनशे प्रकरणांमध्ये निवाडा

जालन्याची राज्यात आघाडी
जालना/वार्ताहर

गत आर्थिक वर्षांत (२०११-१२) जिल्ह्य़ात भूसंपादनाच्या तीनशेपेक्षा अधिक प्रकरणांचा निवाडा करण्यात येऊन वीस कोटींपेक्षा जास्त रकमेचा मोबदला संबंधित शेतक ऱ्यांना देण्यात आला. घनसावंगी तालुक्यातील तनवाडी साठवण तलावासाठी संपादित जमिनीच्या चार कोटी मोबदल्याचे वाटप सध्या सुरू आहे. भूसंपादन उपजिल्हाधिकारी राजू नंदकर यांनी सांगितले की, सार्वजनिक कामांसाठी जमीन संपादन करण्यासाठी चार उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालये जिल्ह्य़ात कार्यरत आहेत. २००५ ते २००९ दरम्यान अनेक शेतक ऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या. त्यापैकी अनेक प्रस्ताव अंतिम निवाडय़ासाठी प्रलंबित होते. जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून जमिनी संपादन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. त्यानंतर भूसंपादन मोबदला देण्याच्या कामाला गती आली. मागील ९-१० महिन्यांत जिल्ह्य़ात ३०२ प्रकरणांमध्ये अंतिम निवाडे घोषित झाले. जिल्ह्य़ात यापूर्वी कोणत्याही आर्थिक वर्षांत मोठय़ा संख्येने निवाडे झाले नव्हते. वर्षभरापूर्वी जिल्ह्य़ात सातशेपेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित होती. पैकी तीनशेपेक्षा अधिक भूसंपादन प्रकरणात निवाडा झाला. सध्या भूसंपादनाची जवळपास ४०० प्रकरणे प्रलंबित असून, ती जुलैपर्यंत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अशा प्रकारे एवढय़ा मोठय़ा संख्येने भूसंपादन प्रकरणी निवाडा करणारा जालना हा राज्यातील एकमेव जिल्हा असावा, असेही नंदकर यांनी सांगितले. तुकाराम मुंडे यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहिली बैठक भूसंपादन अधिकाऱ्यांची व संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांची घेतली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विविध सार्वजनिक कामांसाठी भूसंपादन झाल्यानंतरही संबंधित जमिनी शासनाच्या नावावर केल्या जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल अधिकारी, तलाठी, भूमिअभिलेख निरीक्षक यांच्या अनेक बैठका घेऊन यासंदर्भात सूचना केल्या. त्यानंतर गेल्या नऊ महिन्यांत एकूण १३०० प्रकरणांत जवळपास ३०० हेक्टर जमिनीवर शासनाच्या नावाच्या नोंदी करण्यात आल्या, असेही नंदकर यांनी सांगितले.
घनसावंगी तालुक्यातील तनवाडी साठवण तलावासाठी सव्वाशे हेक्टर जमीन संपादित झाली असून भूसंपादन मोबदल्याचा लाभ मिळणाऱ्यांची संख्या १५७ आहे. एकूण सहा कोटी मोबदल्यापैकी दोन कोटी देण्यात आले. चार कोटी मोबदला वाटपाचे काम सध्या सुरू असून, ते दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. तनवाडी तलाव भूसंपादन प्रकरणाचे मोबदला वाटप २००८ पासून प्रलंबित होते.

Sunday, 26 January 2020

स्वप्नांचा शोध

                                            स्वप्नांचा शोध

स्वप्नांचा अनुभव भूतलावरील तमाम मानव जातीस येतो. स्वप्न का पडतात ? स्वप्नांचे अर्थ काय ? याबाबतचे संशोधन अजूनही बाल्यावस्थेत आहे.  मनी वसे ते स्वप्नी दिसे , अशी सर्वसाधारण स्वप्नाची व्याख्या केली जाते. ती काही अंशी खरी असली तरी ती स्वप्नांचा अर्थ पूर्णपणे सांगण्यास अपुरी पडते. प्रत्येकाला कधी ना कधी स्वप्न पडलेले असते.

आपल्या संस्कृतीत स्वप्नात साक्षात्कार झाला, अशी जोडही दिल्याचे आपणास दृष्टीक्षेपात पडते. स्वप्नाची  अनुभूती निद्रिस्त अवस्थेमध्येच येते. त्यामुळे सर्वप्रथम निद्रिस्त अवस्था म्हणजे काय ? हे पाहणे आवश्यक ठरते.भूतलावर प्रत्येक सजीव शारीरिक रचनेप्रमाणे आणि मेंदूच्या विकासा प्रमाणे निद्रिस्त अवस्थेत  जातो. मनुष्य दिवसांत सरासरी सहा ते आठ तास झोप घेतो. झोप अत्यावश्यक  बाब आहे. झोपेत मेंदूच्या एका विशिष्ट भागाचे कार्य थांबते . मात्र यावेळी  शरीरातील इतर काही अवयव  काम करत असतात.  अशा प्रकारे एकदा निद्रिस्त अवस्था सुरु झाली कि स्वप्नाचा उगम व प्रवास सुरु होतो.

 सर्वसाधारणपणे  कोणत्याही निरोगी माणसाला स्वप्ने पडतात . भीतीदायक स्वप्न , रहस्यमय स्वप्न, आनंददायी स्वप्न, प्रवास स्वप्न, पाठलाग स्वप्न, हरवल्याचे स्वप्न, यशाचे स्वप्न , अपयशाचे स्वप्न,  अपराधीपणाचे स्वप्न, पश्चाताप बाबत स्वप्न अशी विविध  स्वप्ने पडत असतात. स्वप्ने  ही बहुतांशी  पूर्णतः वस्तुस्थितीला धरून नसतात. स्थळांची  व पात्रांची सरमिसळ व अदलाबदल प्रत्येक स्वप्नात पहावयास मिळते , काही स्वप्न आवाज असणारी तर काही स्वप्ने मुकी असतात. निद्रित अवस्थेत गेलो की आपल्या  मेंदू मधील विचार केंद्र , स्मृति केंद्र , भावना केंद्र यांचे परस्परातील जोडणी तात्पुरती बंद होते. त्वचा, नाक, डोळे, कान आणि जीभ यासारख्या शरीराच्या संवेदी अवयवांचे काही प्रमाणात मेंदूशी असलेले न्यूरोटिक कनेक्शन  तात्पुरते  डिस्कनेक्ट होते.  शरीर निर्माण करत असलेल्या एकूण  उर्जेपैकी 30 टक्के ऊर्जा मेंदू जागेपणी वापरतो . त्यामुळे एकदा आपण झोपलो की मेंदूची उर्जेची गरज कमी होते. मेंदूला आवश्यक असणारी विश्रांती पूर्ण झाली की तो हळू हळू जागृत होण्यास सुरुवात करतो. नेमकी या वेळेसच स्वप्नांची निर्मिती सुरू होते. तसेच जर आपण खूप दगदगीमध्ये असाल किंवा मेंदूवर मानसिक व भावनिक आघात करणारी घटना जर घडली असेल तर मात्र मेंदूची आवश्यक विश्रांती व निद्रिस्त अवस्था पूर्ण होण्याआधीच स्वप्न सुरू होतात,  मात्र अशी स्वप्ने ही शरीरसाठी व मानसिक आरोग्यासाठी घातक असतात .

झोपल्या नंतर साधारणपणे चार ते सहा  तासानंतर स्वप्ने सुरु होतात. म्हणजेच मेंदूचा निद्रिस्त अवस्तेत गेलेला भाग त्याची उर्जा पुन्हा प्राप्त झाल्याने त्याचे कार्य सुरु झालेले असते. त्याच्या कार्याला आपल्या शरीराचा  कोणताही आधार न मिळाल्याने तो त्याची एक कथा  आपल्या आठवणीत असलेल्या काही घटना, काही पात्रे व काही स्थळे यांचा परस्पर संबंध निर्माण करून तयार करतो आणि स्वप्नाचा प्रवास सुरु होतो. एकदा स्वप्नाचा प्रवास सुरु झाला कि ती घटना प्रत्यक्ष घडत आहे असा भास झोपेत आपणास होतो .  प्राप्त झालेली अपुरी माहिती व अपुरे विचार याचा मेळ न घालता आल्याने एक कथा तयार केली जाते व तिचे  चित्रण मेंदूच्या पटलावर सुरु होते. मात्र हे चित्रण अत्यंत विस्कळीत स्वरुपात असल्याने ते फक्त निद्रिस्त अवस्थेत अनुभवले जाते . जसे जागेपणी आपल्या मनात येणारे विचार व निर्णय आपण म्हणजेच आपला मेंदू नियंत्रित करत असतो. मात्र स्वप्नाच्या दुनियेत स्वप्नावर मेंदूचे अत्यंत अल्प नियंत्रण असते. जसे आपल्याला चित्रपटगृहात नेण्यात आले व तुमचे हात पाय बांधून चित्रपट पाहायला सांगितलं तर तुमची जी  अवस्था होईल अगदी त्या प्रमाणेच आपल्या संपूर्ण शरीराची  अवस्था स्वप्न पाहतानी झालेली असते . त्यामुळे स्वप्न सुरु करणे व ते बंद करणे हे आपल्या हातात राहत नाही. अगदी हताशपणे आपण भयानक स्वप्न अनुभवत असतो आणि या उलट आनंददायी स्वप्नाचा आनंद सुद्धा आपण निर्विकारपणे घेत असतो.

मेंदूच्या ज्या भागात आठवणी साठवली जाते तेथूनही त्या स्वप्नाला  एक हलकसा प्रतिसाद मिळायला लागतो. ज्या स्वप्नांना स्मृति भागाचा प्रतिसाद मिळतो ती स्वप्न आपल्याला पूर्ण जागी झाल्यावर आठवतात तर ज्या स्वप्नाना स्मृति भागाचा प्रतिसाद मिळत नाही  ती स्वप्ने आपण जागी झाल्यावर आठवत नाहीत. स्वप्नांच्या दुनियेत आपला रोल महत्वाचा असतो किंवा स्वप्नाच्या केंद्र बिंदूवर आपण असतो.स्वप्नात आपल्याला कधीही साईड रोल दिला जात नाही किंवा आपला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग न दाखवता स्वप्न सुरु केले जात नाही.एकदा स्वप्न सुरु झाले कि ते सलग चालत राहते  मात्र काही बाह्य अडथळ्याने  जरी आपल्याला जाग आली आणि स्वप्नाचा अंमल आपल्यावर जास्त असेल तर चित्रपटाच्या मध्यांतर नंतर ज्या  प्रमाणे चित्रपट सुरू होतो तसे स्वप्न पुन्हा सुरु झालेले असते . स्वप्न शक्यतो तीन मिनटे  ते तीस मिनटे पर्यंत चालतात.  एकाच वेळी वेग वेगळ्या प्रकारची  दोन ते तीन स्वप्ने पडत नाहीत तर एक स्वप्न संपल्या नंतर दुसरे स्वप्न सुरू होते,  स्वप्नात आपण हस्तक्षेप करू शकत नाही कारण आपली विचार शक्ती पूर्णतः क्षीण  झालेली असते.  स्वप्नात एक बाब मात्र प्रकर्षाने सर्वांना जाणवते ती अशी की जर तुम्ही स्वप्नात धावत आहात आणि अचानक तुम्ही उंचावरून खाली उडी मारता किंवा  पडता तेंव्हा तुमची पूर्ण बॉडी हालते व छातीत धस होते . याचे मागचे कारण असे की अशी घटना स्वप्नात जरी घडत असली तरी तो संदेश आपल्या तोल सावरणार्‍या मेंदूतील केंद्र मार्फत मज्जातंतू द्वारे शरीराच्या इतर  अवयवांकडे पाठवला  जातो. हे एकंदर झोपेत काही लोक चालतात या सारखे आहे .लहान वयात किंवा तरुण वयात स्वप्ने जास्त का पडतात याचे एकमेव कारण हेच की तुमचा मेंदू हा जास्त सक्रिय असतो आणि पुरेशी झोप घेतली जाते .एकदा निद्रिस्त अवस्थेत आपण गेलो की  अशा या स्वप्नाच्या दुनियेत आपण प्रवेश करणे न करणे आपल्या हातात नसते . पहाटे स्वप्ने पडणे ही उत्तम आरोग्याचे व तुमचा मेंदू अॅक्टिव असल्याचे ते एक लक्षण आहे . स्वप्न ही आभासी असल्याने त्यांचा तसा प्रत्यक्ष जीवनावर लगेच परिणाम होत नाही. लक्षात राहणारी व वारंवार पडणारी स्वप्नांचा संबध आपल्या प्रत्यक्ष जीवनपद्धतीशी असतोच असेही नाही . स्वप्नांचा अर्थ लावण्याचा व शोधण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो. आपली भावनिक स्थैर्यता व भावनिक बुद्धिमता  प्रत्यक्ष स्वप्नांची दुनिया निर्माण करत असतात.त्यामुळे स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी आपले पूर्व आयुष्या मधील घटना व त्या घटनांचा आपल्या भावनांशी असलेला कार्यकारण भाव शोधावा लागतो. असा संबध शोधताना राग,आनंद,दुख,तिरस्कार,भीती व आश्चर्य ह्या सहा मुख्य भावनांचा विचार करावा लागतो . पडलेले स्वप्न या सहा भावना पैकी एकीचे प्रतिनिधीत्व करत असते . एकदा हा संबध शोधला की त्या प्रमाणे त्या मागील कारणाची मनोसोपचार चिकित्सा करून त्या प्रमाणे उपयोजन करता येते.  मात्र झोप पूर्ण होण्या अगोदरच स्वप्न पडत असतील तर निद्रानाश  होवून मानसिक व भावनिक संतुलन ढासळते . तसेच पडणारी स्वप्न ही मेंदूच्या  स्मूर्त्ति केंद्रात वारंवार साठायला लागली तर तुमची दैनंदिन विचार प्रक्रिया विस्कळीत होते .  असे असले तरी स्वप्ने ही भविष्याची मुहर्तमेढ रोवण्याचे काम करत असतात . अशक्यप्राय वाटणार्‍या गोष्टी व धेये साध्य करण्यासाठीचा आत्मविश्वास ही स्वप्नेच  आपणास देत असतात .  स्वप्ने ही मानवीमनाला आशावादी ठेवतात त्याचबरोबर जीवनाला एक अर्थ प्राप्त करून देतात.

 राजीव नंदकर,हिंगोली.

(लेखक उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत )     

rsnandkar@gmail.com ,9970246417    

Thursday, 26 September 2019

आनंद सुखात परावर्तीत करा.

*आनंद सुखात परावर्तीत करा.* मानव हा एक चमत्कारिक ,गुंतागुंतीचा,क्लिष्ट व समजण्यास- समजून घेण्यास अत्यंत अवघड असा प्राणी आहे. मानवी मन अथांग आहे,तर त्यातील भावनांची खोली गहन आहे. आत्मा (Soul ),मन (Mind) बुद्धी (Brain)यांचा भेद करणे अनेकांना शक्य झाले नाही. मानवी मन व मेंदू मिळून भाव भावनांचा अविष्कार घडून येतो. मानवात प्रामुख्याने राग,लोभ,भिती,दुःख,तिरस्कार,इर्षा,लजा,आनंद,आश्चर्य या भावनांचा समावेश होतो. या सर्व भावनांपैकी आनंद- सुख व त्यांचा परस्पर संबधाबाबत जाणून घ्यायचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत . मला आनंद झाला असे आपण बहुदा ऐकतो पण मला सुख मिळाले असे आपण क्वचित ऐकतो. आपण आनंद व सुख हे एकच आहे अशी गल्लत करून बसलो आहोत. आनंद म्हणजे Joy आणि सुख म्हणजे Happinessअशी सरळ विभागणी इंग्रजी शब्दकोशात केलेली आहे. अजून विस्ताराने पाहिल्यास आनंद म्हणजे feeling of great pleasure at point of time तर सुख म्हणजे A state of feeling joyful for a substantial period of time.आपण आनंद साजरा करतो मात्र तो आनंद सुखामध्ये परावर्तीत करत नाहीत. यामुळे मानवी जीवन समयोजनामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याचे दिसून येते . आनंद व सुख यांचा परस्पर संबध प्रस्तापित न झाल्यास एका ठराविक काळानंतर नैराश्य येते . त्यामुळे आनंद हा क्षण शास्वत सुखामध्ये कसा परावर्तीत करता येईल या बाबतही जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत. आनंद सुखामध्ये कसा परावर्तीत होतो हे अजून सविस्तर सांगायचे म्हटले तर लहान बाळापासून सुरुवात करूया, त्याला आई दिसली की आनंद होतो पण जेंव्हा आई त्याला कुशीत घेते तेंव्हा त्याला सुख मिळते. वर्गात आपल्याला चांगले मार्क मिळाले की आपल्याला आनंद होतो मात्र तेच मार्क मिळाल्‍याची बातमी आपण आपल्या आईवडील यांना सांगतो तेंव्हा आपल्याला सुख मिळते. सुख व आनंद ह्या मध्ये एक पुसटशी रेषा आहे. ‘आनंद साजरा केला जातो तर सुख अनुभवले जाते’. The happiness realized while the joy celebrated. एका छोट्या शहरात एका छोट्या झोपडीत एक कुटुंब राहत असते. नवरा व बायको त्यांची दोन मुले असे हे कुटुंब असते. नवरा व बायको वीटभट्टीवर काबाडकष्ट करतात तर मुले जवळच्या शाळेत शिकत असतात. नवरा व बायको वीटभट्टीवर रोज खूप कष्ट करतात आणि ते काम त्यांचा आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला असतो. मात्र ते छोट्याश्या झोपडीत राहूनही आनंदी असतात कारण वीटभट्टी वर पुढील ५ वर्ष पुरेल एवढे काम असते, भाड्याची खोलीसुद्धा त्यांना काम आहे तोपर्यंत त्यांच्या ताब्यात राहणार असते आणि सर्वात महत्वाचे त्यांची दोन्ही मुलांची शाळेत शिक्षणाची सोय लागलेली असते . ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य एवढेच की ते कुटुंब आनंद जरी त्यांच्या दैनंदिन जीवनात साजरे करत नसले तरी ते त्यांच्या पातळीवर सुख अनुभवत आहोत. शेवटी सुखाचा मार्ग हा समाधानाच्या वाटेवरुन जातो. अपेक्षा कमी असल्या की,समाधान लवकर मिळते आणि एकदा समाधान प्राप्‍त झाले की, सुख मिळण्यास सुरुवात होते. आता हा आनंद साजरा करायचा की त्यातील सुख अनुभवाचे हे ज्याचा त्याचा त्याचा प्रश्न असतो. एका शहरात एक चांगल्या कंपनीत एक व्यक्ती व्यवस्थापक या पदावर काम करत होता एक लाख पगार , गाडी, कंपनीने दिलेले घर असे जे काही हवे ते त्याच्याकडे होते. सुशील पत्नी व गुणी मुले असे सर्व वैभव त्याच्याकडे होते . असे असूनही तो सुखी नव्हता कारण त्याला छान पैकी एक अलीशान बंगला हवा होता ,असलेल्या कारपेक्षा त्याला महागडी कार त्याला हवी होती. जे त्याच्याकडे आहे त्यापेक्षा त्याच्याकडे जे नाही त्याचे आकर्षण त्याला जास्त होते . त्यामुळे तो असलेल्या भौतिक सुविधांचा उपभोग तो घेवू शकत नव्हता . त्यामुळे कधी कधी त्याला नैराश्‍य यायचे त्याचा राग तो आपल्या पत्नी व मुलांवर काढत असे त्यामुळे घरातील वातावरण अत्यंत नाजूक बनले होते.मानवी स्वभाव असाच आहे , जे स्वतःकडे नाही त्याबदल त्याला नेहमीच आकर्षण राहिले आहे. तिसरी गोष्ट अशी की एका व्यक्तीला लॉटरी लागली म्हणून त्याला खूप आनंद झाला . त्याला नंतर कळले की लॉटरीच्या रकमेवर 30 टक्के टॅक्स लागतो. मिळणारे पैसे कोठे ,कसे व केव्हा गुंतवायचे याची त्याला काळजी वाटायला लागली. पैसे मिळणार म्हणून आपल्याला कोणी मारणार तर नाही ना याची त्याला भीती वाटायला लागली. आपले कुटुंब,नातेवाईक व मित्र यांच्यामध्ये तो स्वतःला असुरक्षित समजू लागला. हळू हळू त्याच्या आनंदाची जागा भीती Fear आणि काळजीWorried यांनी घेतली. त्या लॉटरी च्या पैशातून निर्माण होणारे सुख Happiness अजून त्याच्या आयुष्यात येणार होते . त्यापूर्वीच तो दुःखी व असह्य झाला. नंतर पैसे मिळाले पण त्याचा त्याला उपभोग घेवुन त्यातून त्याला सुख निर्माण करता आले नाही . व्यसनाधिनता, वाईट सवयी याच्या चक्रव्‍युहात तो फेकला गेला. हळू हळू यातच त्याचा अंत झाला . म्हणजेच त्याने आनंद साजरा केला परंतु त्याचे समयोजन तो सुखात करू शकला नाही . आपल्या अवतीभोवती अनेक लोक असे असतात की त्यांना खूप संपत्ति मिळते परंतु तिचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे त्यातून फक्त आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र सुख खूप दूर राहून जाते . उपरोक्त तीनही घटनांवरून आपल्या असे निदर्शनास येते की, सर्व प्रथम जे आपल्या जवळ आहे त्याचे आपल्याला महत्व असले पाहिजे त्याबाबत आपण समाधानी राहिले पाहिजे . याचा अर्थ असा कदापि होत नाही की आपली महत्वाकांक्षा , आपले ध्येय , आपले लक्ष याकडे आपण मार्गक्रमन करणे सोडून दिले पाहिजे . उलट असा प्रवास व मार्गक्रमण होत असताना आपण आपल्याजवळ आहे त्याचे सुख घेण्यास विसरले नाही पाहिजे . चांगले दिवस कधीच येत नसतात जे दिवस आपल्या हातात आहेत ते आपण चांगले बनवायचे असतात . काही लोक मला नंतर चांगले दिवस येतील यासाठी आपले आरोग्य आपले कुटुंब याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात आणि आयुष्यभर नुसती स्पर्धा व धावपळ करत राहतात अगदी आयुष्याचा शेवटचा क्षण येतो तरीही त्त्यांची धावपळ थांबलेली नसते . वास्तविक मानवी जीवन हा एक प्रवास आहे या प्रवासात येणारे दुख: :आपण पचवले पाहिजे तर प्राप्त होणारा आनंद सुखं मध्ये परावर्तीत केला पाहिजे. आनंद हा एखादी ठराविक घटना घडल्यानंतर एका ठराविक अशा वेळी निर्माण होत असतो. The joy will be emerge out and celebrated at point of time but the happiness give you internal immense pleasure forever. It will stay for a long time. मला आनंद झाला असे आपण म्हणतो म्हणजे त्याची जाणीव तुमच्या मेंदुस होते. मात्र जेंव्हा तुम्हाला सुख मिळते त्याची अनुभुती Realization तुमच्या आत्म्यास व मनास होते . हळू हळू या सुखाचा प्रभाव तुमच्या शरीरावर सुद्धा होतो. जे लोक आनंदी राहतात त्यांच्यापासून अनेक आजार दूर पळून जातात हे आपण ऐकतो व वाचतो परंतु त्याचा स्वीकार आपण करत नाहीत किंवा त्या प्रमाणे आपले वर्तन आपण ठेवत नाही . आनंद द्विगुणित झाला व तो इतरांसोबत वाटून घेतला की सुखाची अनुभूती सुरू होते . एखान्दी मनासारखी गोष्ट घडते , आपल्याला काही अनेपेक्षित लाभ होतो, आपल्याला यश मिळते , आपली अपेक्षा पूर्ण होते, आपण जिंकतो अशा अनेक प्रसंगात आपल्याला आनंद होतो . परंतु असा आनंद सुखात परावर्तीत करण्याचे आपण लोक विसरून गेलो आहोत . आपल्या बुद्धीला सोशल मिडीयाचा गंज चढला आहे त्‍यामुळे आपले मन असंवेदनशील बनले आहे. याचा परिणाम आपल्‍याला प्राप्‍त झालेला आनंद खूप वेळ आपण टिकवत नाहीत किंवा आपलायला टिकवता येत नाही . त्यामुळे आयुष्यात अनेक चांगले प्रसंग व घटना घडून सुद्धा आपण दुखी राहतो किंवा दुखी होत आहोत . इतर व्यक्तीच्या आयुष्यात घडणारा आनंदी क्षण आपण सहन करू शकत नाही . दुसर्‍याला आनंद झाला तर आपल्या मनात इर्षा, तिरस्कार ह्या भावना आपोआप का निर्माण होतात . एथेच तर खरी गोम व मेख आहे . आपण स्वत: आपल्या अंर्तमनात डोकावून पाहणे , आपला आत्मा व आपले मन यांचेशी संवाद साधने या गोष्टी या धावपळीच्या युगात आपण विसरून गेलो आहोत . त्यासाठी आपण सर्व प्रथम आपण कोण आहोत. आपली धाव कुठपर्यंत आहे, आपण काय करू शकतो , याची प्रथम निश्चिती करा. म्हणजे आपली रेषा आखून घ्या . एकदा अशी रेषा आखली की इतरांचे यशाची रेषा तुमच्या रेषेपेक्षा मोठी झाली तरी तुम्हाला फरक पडणार नाही . आणि त्यामुळे इतरांचे यश किंवा आनंद किंवा सुखं आपल्या डोळ्यात खुपणार नाही . वास्तविक प्रत्‍येक व्यक्ति हा निसर्गाचा एक स्वतंत्र आविष्कार असून त्याप्रमाणे त्याला आपल्यापेक्षा वेगळी बुद्धी , मन, आत्मा, क्षमता,परिस्थिती सृष्टीने त्याला उपलब्ध करून दिली आहे. त्यानुरूप त्याचे यश व कर्तृत्‍व फुलते व बहरते . सांगण्याचे तात्पर्य एवढेच की , जो पर्यन्त दुसर्‍याचा आनंद आपण साजरा करायला आपण शिकत नाहीत किंवा तसे आपल्याला मनापासून वाटत नाही तोपर्यन्त आपण आनंदी व्हाल मात्र सुखी होणार नाहीत. आनंद हा फुलाच्या किंवा अगरबत्तीच्या सुंगंधासारखा असतो कालानुरूप ,वेळेनुसार व जागेनुसार त्याची तीव्रता कमी कमी होत जाते तर सुख हे खूप गडद व घट्ट असते सहसा ते कालानुरूप कमी कमी होत असले तरी ते अंर्तमनास समाधान देते व ते खोलवर जाते. एखादी आनंददायी घटना किंवा बाब, घडली तर ती वाटायला शिका . ती जेंव्हा वाटायला जाणार तेंव्हा ती द्विगुणित होवून सुखा मध्ये परावर्तीत होईल . उदाहरणादाखल आपल्या पाल्याला परीक्षेत चांगले गुण मिळाले तरीही काही लोक आपल्या मित्राच्या पाल्याला किती गुण मिळाले हे आधी तपासतात . काही लोक अजून थोडे जास्त गुण मिळायला हवे होते असे म्हणतात . मात्र असामान्य लोक मिळालेल्या गुणांबाबत पाल्याला शाबासकी देतील, चार चौघात माझा पाल्य कसा कष्टाळू आहे याची स्तुती करतील, पाल्याच्या मित्रांना बोलवून घरी जेवण ठेवतील आणि मित्र व आप्तेष्ट यांना घरी बोलवून भोजन देतील. सांगण्याचे तात्पर्य हे की आनंद हा एका क्षणासाठी साजरा करायचा की तो सुखामध्ये रूपांतरित करायचा हे आपल्या हातात असते . यातून हे कळते की प्रत्‍येक आनंदाचा क्षण आपण सुखामध्ये रूपांतरित करण्‍याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा त्यामुळे तुमचे आयुष्य अधिक सोपे , सुटसुटीत व सुसय्य होईल . *राजीव नंदकर*© उपजिल्हाधिकारी,जालना. 9970246427 rsnandkardc@gmail.com

Wednesday, 9 January 2019

मुलाचे संगोपन व संस्कार हा विषय मानस शास्राचा ,सामाजिक शास्राचा व जीव शास्राचा आहे.  या तीनही शास्राच्या अनुषंगाने हा विषय तपासून घेण्याचा प्रयत्न या प्रस्तुत लेखात करण्यात आला आहे . मुल जन्माला आल्या नंतर त्याची शाररिक , बौद्धिक व मानसिक वाढ काळानुसार व वर्षोगणिक होत असते. साधारण पणे ०-६ वयोगट हा बाल्यावस्थेत येतो,६-९ ह वयोगट पौगड्या अवस्थेत येतो , ९- १४ हा वयोगट कुमार अवस्थेत येतो, १४ ते ३४ हा वयोगट तरुण अवस्थेत येतो तर  ३५ ते ६० ही प्रोढ  अवस्था समजली जाते शेवटी ६० च्या पुढे वृध्द समजले जाते .या लेखाच्या मर्यादा आपण मुले व त्याचे तरुणपण एवढीच मर्यादित ठेवली आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे  .
            मुलांचे संगोपन करणे व त्यांच्यावर विविध मुल्ये यांचे संस्कार करणे ही जबाबदारी सामाजिक शास्रानी पालक म्हणजे आई ,वडील व शिक्षक यांच्यावर टाकली  आहे . आपल्या भारत देशात ही जबाबदारी पालक यतार्थ पणे मुलांचे वय वर्ष ३४ होवे पर्यंत विनासायास पार पडत असतात . वास्तविक जैविक शास्रात  कोणताही प्राणी इतके वर्ष आपल्या पिलांचा सांभाळ व संगोपन करत नाही . मुलांचे संगोपन करत असतानी आपण ०-३४ वय असा सरसकट विचार करतो हेच मुळी चुकीचे आहे,  वास्तविक उपरोक्त निर्देशित अवस्थेप्रमाणे त्यांचा विकासाचा पाया रचणे जास्त श्रेयष्कर ठरते . त्याच सोबत विविध शास्र जसे जैविक,मानस,सामाजिक याचा योग्य वेळी योग्य  वापर करणे हितावह असते.मुल घडवण्याचे अथवा ते  सुसंस्कृत व कर्तुत्ववान बनवण्याचे  असे कोणतेही सूत्र उपलब्ध नाही . तर  मुले वाढत असताना अनेक  घटकांचा  त्यांच्यावर पडत असलेले प्रभावाने हळूहळू ते उत्कर्ष पावत असतात .या घटकांपैकी आई ,वडील, कुटुंब , नातेवाईक  ,शिक्षक ,मित्र व समाज हे दृश्य घटक त्या वाढणाऱ्या मुलावर प्रभाव पडत असतात . ह्या घटकाचे  प्रभाव व कार्य हे एकसारखे नसून ते बदलणारे व कमीजास्त होणारे असते आणि त्यामुळे एक घटक प्रभावी असून चालत नाही तर योग्यवेळी तो तो घटक प्रभावी व्हावा लागतो . ज्या प्रमाणे  एखांदी औषधी आपण घेतो व त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात त्या प्रमाणे ह्या  घटकांचे सकारात्मक व नकारातात्मक  प्रभाव त्या मुलावर पडत असतात.
          मुले ही मातीचा गोळा असतात असे आपण म्हणतो,अशा या गोळ्याला आकार देण्याचे काम विविध घटक करत असतात.सद्याच्या जीवन शैलीत गर्भ पोटात असतानाच त्यावर संस्कार केले जातात. विविध शिबिरे, कार्यशाळा, चर्चासत्रे यातून जन्माला येणाऱ्या मुलावर संस्कार कसे करावे याचे धडे दिले जातात . हे जरी आवश्यक व नियमाला धरून असले तरी बऱ्याच वेळा त्याची अतियोशक्ती झालेली आपणास दिसून येते .बरे असो आपल्या मूळ मुद्याकडे आपण परत येवू की मुलांचे संगोपन व संस्कार बाबत अनेक घटक कसे कारणीभूत होतात यावर आपण नियंत्रण कसे मिळवू शकतो .आपले मुल जन्माला आल्या पासून ते प्रोढ  होइपर्यंत त्यावर अनेक घटक प्रभाव दाखवत असतात ,मात्र यातील काही घटक हे पालक नियंत्रित असतात तर काही घटक ते मुल नियंत्रित करत आसते तसेच या वेळी बाह्य घटक तेवढेच प्रभावी ठरत असतात .त्या अनुषंगाने आपण या घटकांचा योग्य वेळी प्रभाव कसा वाढवायचा व योग्य वेळी प्रभाव कमी कसा करायचा याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत . 
         आई  व वडील यांच्या मिलनातून सुप्रजा जन्माला येते . आई व वडील यांचे गुण सूत्रांचे   मिश्रण आपल्याला त्या मुलाच्या अतरंग व बाह्यरंग यात पाहायला मिळते .एकंदर काय मुल हे जैविक रित्या आई व वडील यांचे पासून निर्माण झालेली प्रोजेनी असते .साहजिकच त्या अनुषंगाने अवयवजन्य उदासीनता (Inbreeding depression)  व  संकरीत जोम ( Hetrosis )ह्या संकल्पना ची माहिती वाचकापर्यंत पोहचवणे आवश्यक ठरते . हिंदू रिवाजाप्रमाणे एका गोत्रात लग्न केली जात नाहीत याच्या मागे खूप मोठा जैविक आधार आहे . जीव शास्रानुसार एकाचा नाते संबधात लग्न केल्याने अवयवजन्य उदासीनता (Inbreeding depression) निर्माण होवून जन्माला आलेले बालक मानसिक व शारीरिक दृष्ट्या म्हणावे तेवढे सक्षम होवू शकत नाही . याउलट दूरच्या नाते सबधात लग्न केल्याने संकरीत जोम ( Hetrosis ) होवून जन्माला येणारी प्रोजेनी ही सक्षम व प्रतिकारक्षम निर्माण होते. एकंदरच मुले जन्माला आल्यानंतर ते आई वडील त्याचे दोन आजोबा व दोन आजी यांचे काही गुण वैशिष्टे घेवून जन्माला आलेले असतात.
           एकदा मूळ जन्माला आले की शून्य ते सहा या वयोगटात त्यांचा संबध आई  व वडील यांच्याशी  जास्त असतो व तो साहजिकच आहे .ह्या वयोगटात मुले संस्कार आत्मसाद करत जरी नसली तरी त्यांच्या विविध सवयी नियंत्रित करणे त्यांच्यात  सकारात्मकता निर्माण करून देणे बाबतची दक्षता या वयात पालकांनी  घेणे गरजेचे असते . जसे एखांदे फुल कळीच्या स्वरुपात असेल तर त्याला जपावे लागते त्याच प्रकारचा काहीसा हा प्रकार आहे  .या वयात त्यांना गोष्टी सांगणे, आपले नातेवाईक व  कुटुंबीय कोण आहेत याची ओळख करून देणे , खाण्याच्या सवयी याच वयात मुले आत्मसाद करतात त्यामुळे खाण्याच्या  सवयी ह्या चौरस आहार युक्त  ठेवण्याकडे कल पालकांचा असणे अगत्याचे तसेच अनिवार्य ठरते. ह्या वयात मुलाच्या मेंदूची वाढ होत असल्याने ह्या वयात पोषणआहार व आरोग्य यावर पालकांनी भर देणे गरजेचे आहे.
         सात ते चौदा  हे वय म्हणजे किशोर वय किंवा कुमार वय ह्या वयात मुलांचा बराचस वेळ शाळेत व्यतीत होत असतो .साधारणपणे  आठ तास शाळा, आठ तास घरी व  आठ तास झोप याप्रमाणे  दिनचर्या ठरलेली असते . म्हणजे पालकांना मुलांचे सरासरी फक्त आठ तास उपलब्ध होत असतात.  काही वडिलांना तर मुले दोन ते चार तासच उपलब्ध होतात. या वयात मुले खोडकर व हट्टी झालेली असतात .हे वय मुलांच्या वाढीसाठी व संगोपन व संस्कार साठी खूप महत्वाचे असते . मात्र पूर्वीच्या बाल्या अवस्थेमध्ये जेवढे लक्ष बालकाकडे दिले जाते त्यापेक्षा खूप कमी लक्ष या किशोर कडे दिले जाते आणि इथेच घोळ होतो.वास्तविक हा काळ संवेदनशील व नाजूक असतो. मुले आता त्यांचे विचार प्रकट करत असतात. त्यांची ते वैयक्तिक मते बनवत असतात. राग, लोभ, मस्तर, असूया व चीड ह्या नकारात्मक भावना तर आनंद, हर्ष, प्रसनता व  समाधान या सकारात्मक  भावना त्यांचे मध्ये निर्माण होत असतात. विविध हार्मोन्स चा सुद्धा स्राव  शरीरात होत असल्याने  त्या प्रमाणे त्यांच्यात मानसिक व भावनात्मक बदल होत असतात .या काळात सर्वच  जोडप्यांना दुसरे मुल झालेले असल्याने साहजिकच एक्केकेंद्री कुटुंब असेल तर आई व वडील या दोघांचे दुर्लक्ष थोरल्या मुलाकडे होते आणि नेमकी या वेळी इतर जे नकारात्मक  घटक ज्याची आपण पुढे चर्चा करणार आहोत ते प्रभावी  होतात. एकंदर या वयात उपलब्ध होणारे आठ तास आई  व वडील यांनी या मुलांना देण्याचा कसोशीने प्रयत्न केला तर बऱ्यापैकी मुलांची  शारीरिक व मानसिक निकोप वाढ होवू शकते. मूल घरी आल्यानंतर त्याची चौकशी करणे, त्याच्या मित्रा बाबत विचारणे,, शाळेत काय शिकवले या बाबत त्याला विचारणे, त्याच सोबत त्याला विश्वासात घेणे  या शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी जरी पालकांनी रोज पूर्ण केल्या तरी त्याचा फायदा आपल्या लगेचच दृष्टीक्षेपात येतो. एकंदरच  किशोरवयात  किमान ८ तास  मुलांना पालकांनी देणे व त्यांच्यात विश्वास व सकारत्मकता निर्माण करणे ही संस्कार व संगोपनाची पहिली पायरी ठरते .
             पंधरा  ते चोवीस  हा वयोगट तरुण म्हणून संबोधला जातो. आता हे तरुण पालकांच्या बंधनातून  मुक्त होवून स्वस्चंदी झालेली असतात तसेच विहार व व्यवहार करण्यास ते तयार झालेले असतात . या वयात मुले आठ तास झोप ,आठ तास कॉलेज, चार तास घरी व चार तास बाहेर वावरत असतात असे ढोबळ पणाने म्हणता येते व तशी सर्वसाधारण परीस्तीती असते . या वयात मुले अनियंत्रित व बंडखोर झालेली असतात आणि पालकांची जरी जबाबदारी वाढलेली असली तरी इतर घटक मोठ्या प्रमाणावर मुलांवर प्रभाव पाडत  असतात. असे असले तरी पालकांची भूमिका डावलून अथवा बाजूला सारून चालत नाही .या वयात मुले घरातील चर्चेत सहभागी होण्याचे टाळत असतील तर ती एक धोक्याची घंटा आहे हे पालकांनी ओळखले पाहिजे. एकदा संवाद तुटला की तो परत जोडणे खूप अवघड होते. त्यामुळे आपली मुले कोठे जातात, काय करतात , त्यांचे मित्र कोण या बाबत डोळसपणे व अस्तावायिकपणे चौकशी करणे पालकांकडून आवश्यक व अनिवार्य ठरते. बऱ्याच  वेळा मुले मोठी झाली त्यांना सर्व कळते त्यांना त्यांचे निर्णय घेवू द्या असा भोळा भाबडा विचार पालक करतात आणि मोठी चूक करून बसतात .वास्तविक मुलांचे निर्णय वास्तुस्तीतीशी तपासून घेतले की ते चुकण्याची शक्यता कमी राहते. त्यामुळे मुलांकडे निर्णय क्षमता असावी मात्र ते निर्णय एकतर्फी असणार नाहीत याची दक्षता सुज्ञ पालकांनी घेणे आवश्यक आहे.मुलांनी हव ते कराव पण एकदा पालकांकडून ते तपासून घेवून कराव.पालकांनी मुलांचे आई  व वडील या भूमिकेतून बाहेर येवून मित्र व मैत्रीण ही भूमिका स्वीकारली कीअर्धी मोहीम फत्ते झाली असे समजा .
            शून्य ते सहा वयोगटात मुले आपले आई वडिलांशी सलग्न असल्याने इतर नातेवाईक व कुटुंबीय जसे आजी , आजोबा, भाऊ, बहिण, आत्या ,मामा,मामी , काका , काकू,  मावशी इत्यादी  सोबत येणारे त्यांचे संबध हे औपचारिक स्वरूपाचे असतात. लहान बालकास फक्त तोंडओळख यापलीकडे काही माहित नसते . किशोर वयात मात्र मुले नातेवाईक यांच्या कडे जायाला लागतात. विविध विचार व भावनाचे आदान प्रदान ते नातेवाईक  व कुटुंबातील इतर सदस्य यांचे सोबत  करायला लागतात . अश्या वेळी पालकांनी मुलांचा सवांद सकारात्मक असणाऱ्या नातेवाईक  सोबत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे व नकारात्मक असणाऱ्या व वाईट  सवयी असणाऱ्या नातेवाईक यांचे पासून मुलांना दूर ठेवणे हितावह असते. बऱ्याच  वेळा काही पालक पूर्णतः मुलांचा संबंध नातेवाईक पासून तोडतात हे योग्य नाही . यामुळे मुले एकलकोंडी तर बनतातच परंतु त्यांचे मध्ये आपल्याविषयी, नातेवाईक विषयी  असणारी आपुलकीची भावना हळू हळू नष्ट होते. सबब  पालकांनी या बाबत काळजी घेणे आवश्यक ठरते .तरुण वयात नातेवाईक यांचे समवेत ते सल्ला मसलत ते करत असतात म्हणून  योग्य वेळी  मार्गदर्शन सुद्धा आवश्यक असल्याने नातेवाईक  मुलांच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडतात .मात्र त्यासाठी आत्मीयता व संवाद असणे अगत्याचे ठरते . पालकांनी अगदी लहान वयापासूनच मुलांची योग्य व सकारात्मक नातेवाईक  व कुटुंबीय यांचेशी  जवळीक व आत्मीयता निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत .
           किशोर वयात मुले आपल्या मित्रांच्या खूप जवळ असतात .त्यांचे भावना ते मित्रांजवळ व्यक्त करत असतात.जवळपास या वयात शेजारी राहणारे मित्र व शाळेतील मित्र अशी ढोबळ मानाने वर्गवारी करता येते . जवळपास या मित्रा सोबत मुले बारा तास घालवत असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाचे मित्र कसे आहेत. त्यांच्या सवयी कश्या आहेत. आपला पाल्य त्यांच्यामध्ये  कश्या प्रकारे वर्तन करतो या बाबत जागरूक व दक्ष असणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याचे मित्रांना घरी बोलवणे त्यांची विचारपूस करणे यामुळे मुलांना आत्मविश्वास प्राप्त तर होतोच शिवाय पालकांबद्दल पाल्यांचे प्रेम यामुळे वृद्धिंगत होते.  तरुण वयात मुले पूर्णतः मैत्रीनी व मित्र यांचे आहारी गेलेली असतात .योग्य व चांगले मित्र यशाच्या शिखरावर आपल्याला विराजमान करतात तर  निर्बुद्ध व व्यसनी मित्र आपल्या पाल्याला खड्यात घालतात हे पालकांनी कायम लक्षात ठेवावे. या वयात बरेच निर्णय हे बहुमतावर आधारित व ग्रुपचे एकविचाराने घेतलेले असतात. त्यामुळे ते चांगले अथवा वाईट  असो ते या ग्रुप कडून स्वीकारले  केले जातात. सर्वसाधारण पणे मुलांच्या विचार व आचार या वर पूर्णतः मित्रांचे नियंत्रण प्रस्तापित  झालेले असते . आता ही मित्रत्वाची उर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक  हे ओळखणे पालकाचे आद्य कर्तव्य ठरते . नाहीतर मुले वाईट  वळणावर गेल्याचे उशिरा लक्षात आल्यास त्यापासून परावृत्त करणे पालकांना एका ठराविक वेळेनंतर शक्य होत नाही. सबब मुलांचे मित्र कोण आहेत ते काय करतात त्यांचे आई वडील काय करतात याबाबत  मुलांच्या पालकांना माहित असणे महत्वाचे आहे. एकदा की आपल्या पाल्याची मित्राचे वर्तुळ आपणास माहित झाले की आपल्या प्रत्येक गोष्टीचा अंदाज बांधणे  व पडताळणी करणे शक्य होवू लागते. साहजिकच मुलांना त्याच्या मित्रासोबत वृद्धिंगत करणे आवश्यक असते. पालक येथेच चुकतात कीते पाल्याला मित्रापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात .मात्र योग्य चिकित्सा करून चांगले मित्र यांना पाल्याच्या सोबत राहणेस प्रोत्साहन देणे व वाईट  मित्रांपासून आपल्या पाल्याला दूर करणे यासाठी विशेष व चाणाक्ष प्रयत्न पालकांनी करणे गरजेचे आहे.
         शिक्षक हा व्यक्ती मुलांच्या जीवनामध्ये मोठा प्रभाव पाडत असतो मुले लहानपणापासूनच आपल्या मनातील भाव भावना या शिक्षकांच्या समोर व्यक्त करत असतात. त्यांच्या दृष्टीने शिक्षक हाच त्यांचा मार्गदर्शक गुरु असतो. जेव्हा कुमार वयात येतात त्यावेळी या शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. मुलांचे वर्तन नियंत्रित करणे मुलांना योग्य असे संस्कार करणे याबाबत शिक्षकाची भूमिका शालेय वेळेत महत्त्वाची ठरते.  असे दिसून येते की बरेच पालक आपल्या शिक्षकांच्या विषयी बऱ्याच गोष्टी गृहीत घेऊन वावरत असतात त्यामुळे त्यांचे त्यांच्या पाल्याकडे तर दुर्लक्ष होतेच मात्र त्यांच्या पाल्याची प्रगती त्यांना समजून घेता येत नाही किंवा ती जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. बरेच पालक असेही असतात की  ते पूर्णतः आपल्या पाल्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवून रिकामे होतात वास्तविक शिक्षक व  पालक हे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी परस्परपूरक कार्य करत असतात त्यामुळे अशा परिस्थितीत पालकांनी दक्ष  राहणे व दक्ष शिक्षकांनी विद्यार्थ्यांबाबत दक्षता घेणे महत्त्वाचे ठरते. तरुण वयात शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते हे मित्रत्वाचे असायला हवे त्यामुळे बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी यांचे आदान-प्रदान विद्यार्थी व शिक्षक यांच्या मध्ये होते. सर्वात शेवटी याचा फायदा विद्यार्थ्याच्या विकासात्मक वाढीवर  होतो त्यामुळे एक योग्य व  सुयोग्य कौशलाधीष्टीत  नागरिक घडवण्याचे जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडते .मुलांचे वर्तन योग्य राहण्यासाठी व त्यांची वर संस्कार योग्य होण्यासाठी प्रत्येक पालकांनी शिक्षकाच्या संपर्कात राहणे व शिक्षक व पाल्य  यांचे समायोजन घडून आणणे  अगत्याचे ठरते .
          अशा पद्धतीने सामजिक ,जैविक  व मानस शास्राचे विविध पैलूतून मुलांच्या संगोपनाचा विचार केला .योग्य वेळी योग्य प्रमाणात पालकांनी कुटुंबीय , नातेवाईक , मित्र ,शिक्षक यांचे समायोजन केले तर वेगळ्याने मुलांचे संगोपन व संस्कार करण्याची आवश्यकता राहत नाही . चला एक सुजान तरुण की जो स्वताच्या , कुटुंबाच्या ,समाजाच्या व एकंदरच देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावत नेतो तो निर्माण करण्याची जबाबदारी पेलूया .
                                                                                     राजू नंदकर ,
उपजिल्हाधिकारी जालना
9970246417
rsnandkar@gmail.com
Please read my article..
मुलांचे संगोपन अन संस्कार .
From The Maharashtra Times:  https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/shared/ShowArticle.aspx?doc=MTAUR%2F2018%2F08%2F11&entity=Ar01402&sk=E48EFF88&mode=image

Thursday, 26 April 2018

सकारात्मक व कर्तव्यतत्पर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

सकारात्मक व कर्तव्यतत्पर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे -

शासन धोरण, योजना व कार्यक्रम आखत असते. मात्र सदर धोरण, योजना व कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अधिकारी व कर्मचारी क्षेत्रीय स्‍तरावर करत असतात. जिल्‍हा स्‍तरावर योजना राबविताना जिल्‍हाधिकारी हा केंद्रबिंदू असतो व त्याच्या नियंत्रणाखालीच  संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा काम करत असते .
जालना जिल्‍हयात मागील 2 वर्षांमध्‍ये अगदी सहजतेने कार्यरत असलेले व तेवढेच कार्यकुशल व कर्तव्‍यनिष्‍ठ जिल्‍हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांची नुकतीच जिल्हाधिकारी मुंबई शहर या पदावर बदली झाली.  मागील दोन वर्षात जालना जिल्ह्यात त्यांनी केलेल्‍या कामकाजाची समग्र माहिती घेण्‍याचा प्रयत्‍न प्रस्‍तूत लेखामध्‍ये करण्‍यात आलेला आहे.
जालना जिल्‍हा हा औरंगाबाद या ऐतीहासीक शहराला लागून असलेला, मात्र मानवी विकास निर्देशांकात अगदी खालच्‍या स्‍तरावर असलेला जिल्हा .जिल्‍हयाची धुरा जिल्हाधिकारी म्हणून शिवाजी जोंधळे यांनी दोन वर्षांपुर्र्वी स्‍वीकारली. अत्‍यंत शांत व मनमिळावू स्‍वभाव व तेवढीच प्रशासकीय कर्तव्‍यपारायनता व कार्यकुशलता यामुळे ते कमी कालावधीमध्‍येच लोकप्रीय झाले. रोज सकाळी 10.00 वाजता कार्यालयामध्‍ये येणे, संचिकांचा निपटारा करणे व कोणतीही जाहीरातबाजी न करता झिरो पेंडंसीकडे त्‍यांनी केलेली वाटचाल संस्‍मरणीय आहे. कार्यालयीन वेळ संपल्‍यानंतरसुध्‍दा ते जाणीवपुर्वक कार्यालयामध्‍ये थांबत असत. या वेळेमध्‍ये शासनाकडील विवीध धोरणांचा व कार्यक्रमांचा अभ्‍यास करणे व सदर कार्यक्रम जिल्‍हयामध्‍ये कशा प्रकारे राबविण्‍यात येवू शकतील याबाबत ते विचार मंथन करीत असत. या वेळेत ते टेक्‍नोसेवी कामकाज सुद्धा  करत असत. शासनाकडील ई-मेल, शासन निर्णय व परिपत्रके  यांचासुध्‍दा त्‍यांचा दांडगा अभ्‍यास होता . आढावा बैठका घेणे व अधिका-यांना मार्गदर्शन करणे व एवढा कामाचा व्‍याप सांभाळून सामाजिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम यात सहभागी ते जाणीवपूर्वक होत असत, यातून त्‍यांचा मोठेपणाची व कार्यकर्तुत्‍वाची साक्ष मिळते. विकासाच्‍या प्रक्रियेत सामान्‍य व्‍यक्‍ती हा केंद्रबिंदू आहे याची त्‍यांना जाण आहे. म्‍हणूनच येणा-या अभ्‍यांगतांची आदराने ते विचारपूस करत व त्‍यांच्‍या समस्‍यांची सोडवणूक करत असत. शासनाच्‍या योजना व कार्यक्रम प्रभावी पध्‍दतीने क्षेत्रीय स्‍तरावर राबविण्‍यात त्‍यांचा हातखंडा होता.  
समृध्‍दी महामार्गासाठी खाजगी वाटाघाटीने जमीन खरेदी करणे बाबत  केलेले कामकाज  त्यांनी पार पाडले. जवळपास २५ गावात ४३४ हेक्टर पैकी २८५ क्षेत्र खाजगी वाटाघाटी द्वारे संपादित केले याची टक्केवारी जवळपास ६६ टक्के येते . शासनाच्‍या विवीध भूसंपादन प्रकरणात खाजगी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्याबाबतची कार्यवाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. ३९ प्रकरणात १३९ हेक्टर जमिनीचे संपादन खाजगी सरळ खरेदीने करण्यात आले .यात जिल्हाधिकारी यांनी समितीचे अध्यक्ष म्हणून खूप सकारात्मक काम केले .प्रधानमंत्री पिक विमा योजना अंमलबजावणीत तर देशपातळीवरील जालना जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला व जिल्हाधिकारी यांचा यथोचित असा सत्कार आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान  यांनी केला . डिजीटल इंडीयाच्‍या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यात डीजी धन मेळावा घेण्यात आला जिल्ह्यात सध्या २००० पॉस बसवण्यात आल्या . प्रधानमंत्री ग्राम आवास योजनेची अंमलबजावणी असो कि प्रधानमंत्री ग्रामस्‍वच्‍छता अभियान असो जिल्हा अग्रेसर ठेवण्याकडे त्यांचा कटाक्ष होता .
जिल्ह्यातील दोन महत्वाकांशी योजना जालना सिड पार्क व  जालना ड्राय पोर्ट  यासाठी भूसंपादन करणे जिकरीचे  व तेवढेच आव्हानात्मक काम होते जोंधळे सरांनी सिड पार्क साठी ३० हेक्टर जमीन संपादित केली. तसेच ड्राय पोर्ट  रस्त्या साठी खाजगी जमीन संपादन तर केलीच त्याच बरोबर गायरान जमीन उपलब्ध करून दिली . सार्वजनिक वितरण व्यवस्था जिल्ह्यात कार्यक्षम पणे राबवण्यात आली सद्यस्थितीत ७५ टक्के कार्ड धारकांना आधार पडताळणी द्वारे धान्य  वाटप होत आहे . त्यांच्याच  कार्यकाळातच जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत द्वारपोच व थेट वाहतूक सुरु करण्यात आली .उज्वला गस योजनेत १०० रुपयात गरीब व्यक्तीला गस देण्याची योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे . या योजनेत दोन वर्षापूर्वी फक्त ५००० जोडण्या होत्या सद्या  जिल्ह्यात ४२००० जोडण्या देण्यात आल्या आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बाबत महिला व बालविकास अधिकारी यांचे समवेत अनेक कार्यक्रम आखण्यात आले त्याचीच फलनिष्पती म्हणून जिल्ह्यातील गुन्नोतरात  चांगली वाढ झाली.उसतोड कामगारांच्‍या मुलांसाठी विशेष सहाय योजना जिल्ह्यात राबवण्यात आली त्यामुळे पालकासोबत  होणारे मुलांचे स्थलांतर थांबवता येवू शकले .
       जलयुक्‍तशिवार योजना व मागील त्‍याला शेततळे योजना राबवतानी लोकसहभाग खूप महत्वाचा असतो साहजिकच जिल्ह्यात लोकसहभाग व अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर कामे होवू शकली .विभागीय महसूल क्रीडा व सांस्‍कृतीक स्‍पर्धा 2017 भरवण्याचा मान दहा वर्षांनतर प्रथमच जिल्ह्याला मिळाला या स्पर्धाचे नियोजन यशस्वी रित्या पार पाडण्यात आले . जिल्ह्यातील नगर परिषद व जिल्‍हा परिषद व ग्रामपंचायत निवडणूका त्यांच्या कार्यकाळात शांतातामय  वातावरणात पार पाडण्यात आल्या .ero net  संकेत स्थळ  व्‍दारे मतदार नोंदणी मध्ये सुद्धा जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राष्‍ट्रीय बाल कामगार प्रकल्‍प हा जिल्ह्यातील दुर्बल घटकांसाठी काम करणारा प्रकल्प जिल्ह्यात योग्य प्रकारे राबवण्यात आला .मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पासाठी जालना जिल्ह्यात एकूण ८२ गावामध्ये तातडीने जमीन उपलब्ध करून देण्यात आली .सिरसवाडी  येथे २०० एकर जमीन रसायन व तंत्र शिक्षण साठी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु केली. तसेच जिल्ह्यात ई फेरफार योजना ९५३ गावांत प्रत्यक्ष त्यांच्या काळातच सुरु झाली . राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमात त्यांनी अग्रेसर पणा दाखवला त्यामुळे निश्चितच अधिकार अभिलेख व भूमी अभिलेख यांचे संगणिकरणाचा टप्पा जिल्हा गाठू शकला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन शिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही याची त्यांना जाणीव होती. सरासरी 750 मी मी प्रजन्य असलेल्या या प्रदेशात या अभियानातून जलव्यवस्तपन व मृदा संधारण करता येऊ शकेल याची जाणीव त्यांना होती. जिल्हा  स्तरावरून त्यांनी व्यापक प्रयत्न करून व विविध कार्यालयातील विविध योजनांचा convergence साधून कामे  पूर्ण करून घेतली.निश्चितच त्यामुळे ऐन दुष्काळात संरक्षित साठे उपलब्ध होऊ शकले.

 अशा या अत्यंत अभ्यासू व सकारात्मक  व्यक्तिमत्वाने महाराष्ट्र महसूल सेवा व भारतीय प्रशासकीय सेवा यामध्ये आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला आहे .समाजातील तळागाळातीळ समाज माणसाविषयी उत्कट प्रेम असलेले,तितकेच अभ्यासू असे हे व्यक्तिमत्व.जिल्ह्यात काम करत असतांना  या व्यक्तिमत्वा  सोबत काम करण्याची आम्हाला संधी वेळोवेळी प्राप्त झाली. सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतांना जे अनुभव मिळाले व जे शिकायला  मिळाले  तसेच त्याच्या स्वभावाचे विविध पैलू पाहावयास मिळाले ते शब्दबद्ध करण्याचं प्रयत्न मी केला आहे.जालना जिल्हा  काम करायला तेवढाच खडतर व परीक्षा पाहणारा होता. राज्यातील नेहमीच्या प्रश्नापैकी काही वेगळे व मुलभूत प्रश्न त्यांच्या समोर होते..त्यांना हे माहित होते की एवढी मोठी शक्ती त्यांच्याकडे आहे.त्यासाठी त्यांनी या यंत्रणेचे प्रशिक्षणातून क्षमता वृद्धी करता येईल यावर भर दिला ते नेहमी सांगत कि आपण सर्व शासन व्यवस्तेचे संरक्षक आहोत आणि त्यामुळे आपल्या सर्वांची भूमिका ही सामान्य माणूस ,शेतकरी,शेतमजूर याच्या उत्कर्षासाठी असली पाहिजे. शासनाकडून आलेलं दुष्काळी अनुदान शेतकरी खात्यावर जमा करणे बाबत नियोजन करणे व तत्परतेने ते बाधित शेतकरी यांच्या खात्यावर जमा करणे आवश्यक होते,प्राप्त झालेले हे अनुदान अगदी कमी वेळात त्यांनी अचूक नियोजन करून आपल्या प्रशाकीय यंत्रने मार्फत जमा केले. पाणी टंचाई समस्या दुष्काळात उग्र रूप धारण करते त्यामुळे टँकर व विहीर अधिग्रहण सुविधा देणे व त्यासोबत जिल्हा  पातळीवरून त्याचे पर्यवेक्षण करणे अत्यावश्यक ठरते याबाबतीत त्यांनी दुःकाळातील शेवटचा व्यक्ती नव्हे तर टँकर ने पाळीव जनावरांना सुद्धा पाणी पोहचले जाईल याबत दक्षता घेतली.गरज पडली तर ते अगदी मंडळ अधिकारी यांचे पर्यंत सवांद साधत त्यामुळे क्षेत्रीय स्तरावरील अडचणी ते अचूक शोधून त्यावर सकारात्मक उपाय योजना ते सांगत असत. भूसंपादन सारख्या किचकट विषयाचा त्यांना गाढा अभ्यास असल्यामुळे त्यांनी विभागातील विविध कार्यालयाचा योग्य समन्वय साधून जवळपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन पूर्ण करण्यात येऊन  मावेजा भूधारकाना मिळवून दिला. जालना जिल्ह्यातील  शेतीच्या समस्या व त्यामुळे प्रदेशातील अर्थकारणावर होणारे त्याचे दूरगामी परिणाम या बाबत त्यांना कृषी पदवीधर  म्हणून काम केल्याने प्रचिती होती.           
मंत्रालयात ते जिल्ह्याच्या  प्रश्नाबाबत ते चोख बाजू मांडत  व उपाययोजना सुचवत  व त्यांची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करत .असे हे प्रेरणादायी व सर्व आयामी व्यक्तिमत्व आमच्या सारख्या अधिकाऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे, जोंधळे सरांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्या देतो व ते कायम आम्हाला  मार्गदर्शन करत राहतील याची मला खात्री आहे.

                                     राजीव नंदकर ,
                                 उपजिल्हाधिकारी जालना
                                     ९९७०२४६४१७

DO

संपादनाच्या तीनशे प्रकरणांमध्ये निवाडा

जालन्याची राज्यात आघाडी जालना/वार्ताहर गत आर्थिक वर्षांत (२०११-१२) जिल्ह्य़ात भूसंपादनाच्या तीनशेपेक्षा अधिक प्रकरणांचा निवाडा करण्यात ...